व्हॉट्सअॅपवर ठेवले स्टेट्स
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवून आणि दोन पानांची सुसाईड नोट लिहून सामाजिक कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वेदांतनगर पोलीस ठाण्यासमोरील मनस्वी लॉजमध्ये घडली. प्रशांत कचरू साठे (५१, रा. प्रतापनगर) असे मृत सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. सततच्या मानसिक आजाराला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत साठे हे सामाजिक चळवळीत सक्रिय होते. ते आरटीआय पालक संघाचे अध्यक्ष
बहिणीची काळजी घे
▶ आत्महत्येपूर्वी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी प्रशांत यांनी त्यांच्या मुलाला शेवटचा कॉल केला. यश, तू आजी, आई आणि बहिणीची काळजी घे. चांगला अभ्यास कर, शिक्षण घेऊन मोठा हो आणि कुटुंबाला सांभाळ, असा निरोप दिला.
सुसाईड नोटमध्ये आत्महत्येची कारणे
▶ प्रशांत साठे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आपण मागील ५ वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून, जीवनात एकाकी वाटत असल्याने स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. मात्र त्याखाली त्यांनी आत्महत्या करण्याची कारणे म्हणून शिक्षण आणि समाजव्यवस्थेतील ७ गंभीर आणि विदारक मुद्यांवर बोट ठेवले आहे.
होते आणि आरटीईसंदर्भात त्यांनी अनेक आंदोलनेही केली होती. विद्यार्थी दशेत त्यांनी एसएफआय या संघटनेतही काम केले होते. मंगळवारी दुपारी घरून निघतानाच त्यांनी सोबत दोरी घेतली होती. रेल्वेस्टेशन परिसरातील मनस्वी लॉजमध्ये रूम बुक केली. आत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर गळफासाच्या चित्रासह शेवटची भेट रेल्वे पोलिस स्टेशन समोरील लॉज, रूम नंबर ६ असा
मजकूर असलेले स्टेट्स दुपारी २:२२ वाजता ठेवले. व्हॉट्सअॅपवर हे स्टेट्स आणि सुसाईड नोटचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मित्र आणि नातेवाइकांनी तातडीने वेदांतनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत प्रशांत साठे यांनी गळफास घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













