जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे ६, ७ फेब्रुवारीला काही बस फेऱ्या स्थगित

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी)  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जादा वाहतुकीसाठी गंगापूर आगारातून तब्बल ४१ बसेस निवडणूक कामासाठी खाना होणार आहेत. 

त्यामुळे दि. ६ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गंगापूर बसस्थानकावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या, शालेय तसेच काही ग्रामीण बस फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मात्र ही व्यवस्था लोकशाहीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असून प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे. या कालावधीत प्रवाशांना प्रवास नियोजनात अडचण येऊ शकते. तरी प्रवाशांनी ही अडचण समजून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर आगारप्रमुख विजय बोरसे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी प्रशासनाच्या सूचनेनुसार गंगापूर आगारातून जादा बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे ६ व ७ फेब्रुवारी रोजी काही लांब पल्ला, शालेय व ग्रामीण बस फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवाव्या लागत आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
- विजय बोरसे, आगारप्रमुख, गंगापूर