साजवार्ता
Page No.: 3 Date: 16/11/2026
क्षुल्लक वादातून क्रूर कृत्य; हमालवाड्यातील संतापजनक घटना
बनाव करून काढला पळ
१४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता विलास घरी आले तेव्हा साहेबराव आणि कैलास टीव्हीवर चित्रपट पाहत होते. रात्री नऊच्या सुमारास चित्रपट संपल्यावर विलास वडिलांसाठी बिस्किटे आणून बाहेर तंबाखू खाण्यासाठी गेले. अवघ्या १०-१५ मिनिटांतच कैलास तेथे घाबरलेल्या अवस्थेत आला आणि त्याने वडिलांनी मारहाण व शिवीगाळ केली, असा बनाव करत गळ्यावरील जखम दाखवून तिथून पळ काढला. विलास घरी परतले तेव्हा साहेबराव मागील खोलीत उताणे पडलेले दिसले. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने नातेवाईकांना बोलावून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनात नाक आणि तोंड दाबून श्वास रोखल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आईच्या निधनानंतर पित्याने काबाडकष्ट करून मुलाला लहानाचे मोठे केले आणि केवळ स्वयंपाकात मीठ कमी-जास्त झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून त्यांची हत्या केली. ही घटना रविवार (दि. १५) रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा परिसरात घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
मृत साहेबराव यांचा दुसरा मुलगा विलास
म्हस्के (३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, साहेबराव यांच्या पत्नीचे मुलांच्या लहानपणीच निधन झाले होते. दुर्दैवाने साहेबराव यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांचा एक हात निकामी झाला होता. असे असतानाही त्यांनी उमेश, विलास आणि कैलास या तीनही मुलांचे खस्ता खात संगोपन केले.
मोठा मुलगा उमेश कुटुंबासह इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो, तर विलास आणि कैलास हे साहेबराव यांच्यासोबतच राहत होते. विलासची पत्नी त्याला सोडून गेली
आहे, तर कैलास कोणताही रोजगार न करता नुसता उनाडक्या करत होता. या दोघांचीही जबाबदारी साहेबराव यांच्यावरच होती आणि ते एका हाताने स्वयंपाक करून त्यांना जेऊ घालत होते. साहेबराव एका हाताने स्वयंपाक करत असतानाही आरोपी कैलास नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे. कधी जेवणात मीठ कमी, तर कधी तिखट जास्त झाल्याच्या कारणावरून तो वडिलांना वारंवार त्रास देत असे. १४ नोव्हेंबरच्या रात्रीही याच कारणावरून बापलेकात वाद झाल्याचे समोर आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














