भरधाव जीपची दुचाकीला धडक ; १ ठार

Foto
देभेगाव - देवळाणा रस्त्यावर अपघात

कन्नड, (प्रतिनिधी) : शेतात वडिलांसोबत झालेल्या हाणामारीचा राग डोक्यात ठेवून संतप्त झालेल्या मुलाने इतर नातेवाईकांना सोबत घेऊन जीपने भरधाव समोरून येणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यात या अपघातात चुलत भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भावजय गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.

हा अपघात देभेगाव देवळाणा रस्त्यावरील विजय सुखदेव थोरात यांच्या शेताजवळ शुक्रवार, २९ रोजी दुपारी अकरा वाजता झाला. मयत तरुण शेतकऱ्याचे नाव योगेश कानिफनाथ थोरात तर पत्नीचे नाव ऋचा योगेश थोरात असे आहे,
देभेगाव (ता. कन्नड) येथील योगेश कानिफनाथ थोरात (३५) यांचा व चुलत काका जगन्नाथ रंगनाथ थोरात यांच्यात देभेगाव शिवारात गट ६८ मध्ये असलेल्या शेती बांधावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यासंदर्भात परस्परांच्या विरोधात तक्रारदेखील काही महिन्यांपूर्वी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

शुक्रवारी सकाळी योगेश थोरात पत्नी सह शेतात असतानाच चुलत काका जगन्नाथ रंगनाथ थोरात सोबत पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. धक्काबुक्की व मारहाण झाल्यानंतर योगेश थोरात हा पत्नीसह दुचाकीवरून (महा २० एफ. व्ही. ३०८९) देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत होता.

दरम्यान, ही भांडणाची माहिती जगन्नाथ थोरात यांचा गल्ले बोरगाव येथे असलेल्या मुलगा प्रल्हाद थोरात यास कळाली. तो चारचाकी वाहनात इतर नातेवाइकांना घेऊन (महा. १२ एम.व्ही.४३७७) योगेश थोरातच्या मागावर देभेगाव देवळाणा गावाच्या दिशेने निघाला. त्याच वेळी विजय थोरात यांच्या शेताजवळून रस्त्याने जाणाऱ्या योगेश थोरातच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात घडवून आणला. या धडकेत योगेश थोरात रक्तबंबाळ होऊन पडला

तर पत्नी दूर फेकल्या जाऊन हातपाय फ्रें क्चर झाले. चारचाकी रस्त्याच्या बाजूला दूर जाऊन पडली. डोक्यात राग असल्याने अशा परिस्थितीत वाहनातून उतरून प्रल्हाद थोरात व इतरांनी मदतीसाठी तडफडत पडलेल्या योगेशला पुन्हा शिवीगाळ करीत तुला संपवून टाकतो, अशा धमक्या देत लाथा बुक्क्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याच क्षणी आजुबाजूच्या शेतातून घटनास्थळी काही शेतकरी आले. त्यांना पाहताच आरोपी फरार झाले.


या घटनेची माहिती मिळताच गंभीर योगेश व त्यांच्या पत्नीला मोठे भाऊ नामदेव थोरात व इतरांनी व देवगाव रंगारी पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. जोपर्यंत योगेश थोरातच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी :
शनिवारी मध्यरात्री देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जगन्नाथ थोरात, प्रल्हाद थोरात अटकेत असून, महेश थोरात यासदेखील ताब्यात घेतले. गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पालवे यांनी देभेगाव येथे भेट दिली. योगेश थोरात यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास घेत चिकलठाणा येथून अटक केली. दरम्यान रात्री एक वाजता प्रचंड तणावपूर्ण वातावरणात योगेश यांच्या मृतदेहावर देभेगाव येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश थोरातच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजई, पुतणे असा परिवार आहे.