विषारी दारूने घेतले ९ जणांचे बळी...

Foto
सागर  : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूचा कहर पाहायला मिळाला आहे. बंडा भागात विषारी दारू प्यायल्यामुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी रात्री बंडा येथील घूघर, नौराज, बराज आणि जवळच्या परिसरातील लोक दारू प्यायले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.

नातेवाईकांनी आजारी पडलेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

देशातील इतर राज्यांमध्येही विषारी दारूची अशीच प्रकरणं समोर आली आहेत. गेल्या महिन्यात गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ हून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत होते.

पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी २१ आरोपींपैकी १३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि विषप्रयोग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तपासात या दारूमध्ये ३८.५९% मेथॉल असल्याचं समोर आलं होते.