शासकीय भरड धान्य केंद्र सुरू करा; काँग्रेसची मागणी

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी): शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून अतिवृष्टीचे अनुदान वाटप करा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल नलावडे याचा नेतृत्वाखाली तहसीलदार स्वरूप कंकाळ याना निवेदन देण्यात आले.

तालुक्यात परतीच्या पावसाने शेतमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हात तोंडाला आलेला मका सोयाबीन, कापुस फळबाग, भाजीपालाचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याचे जे उरले सुरले पिके राहीलेला मका सोयाबीन, कापूस शिल्लक आहे ते व्यापारी खूप कमी भावाने खरेदी करीत आहेत. त्यामुळे आणखीही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

 दरम्यान, शासनाने दिवाळी पूर्वी नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याच्या बैंक खात्यात मोठा गाजावाजा करून घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र ही शेतकऱ्याची चेष्टा असून तोंडाला पाने पुसली आहे. त्यामुळे मका सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल नलावडे ज्येष्ठ नेतेआबिद जहागिरदार, काँग्रेस शहराध्यक्ष माजीद मणियार, माजी शहर अध्यक्ष अब्दुल समद टेलर, शेख इक्रोमोद्दीन, पांडुरंग पाटील, मासियोद्दीन भाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात टाकावी अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करून रस्ता रोको, उपोषण करण्यात येईल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.