विभागीय आयुक्त पदाचा कारभार हाती घेतात सुनील केंद्रेकर यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात घेणे सुरू केले आहे मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून टंचाईग्रस्त भागात चारा छावण्या सुरू कराव्यात असे आदेश त्यांनी दिले.
दुष्काळाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्हाधिकाच्यांनी प्रत्यक्ष गावे, वाड्या-वस्त्या फिरून दुष्काळाचा आढावा घ्यावा. गरज असेल त्या ठिकाणी तत्काळ चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना विभागातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिली. दुष्काळ -परिस्थिती गंभीर असून त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे.
स्वतः दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाडाभर फिरणार
जनावरांसाठी चारा छावण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव प्राप्त झाल्यावर
जिल्हाधिकारी यांनी स्वतःस्थळ पाहणी करावी. आजूबाजूच्या गावांची पाहणी करून परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच मंजुरी द्यावी. फिरल्याशिवाय दुष्काळाचे निवारण करता येणार नाही, मी स्वतः दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाडाभर फिरणार आहे असे ते म्हणाले.