विना विलंब मका खरेदी केंद्र सुरू करा; अतिवृष्टीचे अनुदान द्या

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): राज्य सरकारने घोषणा केलेली शासकीय हमी भाव योजनेची मका खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम लवकर जमा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) कन्नड तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कली आहे.

या संदर्भात त्यांनी बहसीलदार यांना निवेदन दिले नाहे. कन्नड तालुक्यातील का पिकाची नोंद १ डसेंबरपासून घेण्यात येत बाहे. एक महिना लोटूनही उसकीय हमी भाव योजनेची का खरेदी केंद्रे सुरू झालेली ही. तात्काळ ती सुरु झाली. असती तर शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली असती. शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावरून उधारीवर बियाणे, खते घेतली असतात. दहा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडणार उबाठा सेनेचे तालुका संघटक डॉ. अण्णा शिंदे यांचे तहसीलदारांना निवेदन शेतकरी पडेल त्या भावाने मका विक्री करत आहे. 

ही केंद्रे सुरू न करणे हा सरळ शेतकऱ्यावर अन्याय आहे. तालुक्यातील २० ते २५ टक्के शेतकरी अनुयानापासून वंचित आहेत, त्यांच्या बैंक खात्यावर १० दिवसांच्या आत अनुदान जमा करावे अशी मागणी या निवेदनातून डॉ. शिंदे यांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन १२ जानेवारी २०२६ पासून कन्नड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देताना उबाठा सेनेचे तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, वामनराव सोनवणे, शहरप्रमुख विश्वनाथ त्रिभुवन, बळीराम जाधव, विश्वास राठोड यांच्यासह उबाठा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.