छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे सलग १३व्या वर्षी उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध - स्पर्धा, तसेच महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे माजी संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी दिली.
1
राज्यस्तरीय उर्दू शिक्षक निबंध स्पर्धेचा विषय मोहब्बते रसूल (स.अ.) के अमली
तक़ाज़े और हमारी गफलत हा असून, त्यावर १००० ते १२०० शब्दांत (सुमारे ५ पाने) निबंध लिहून पाठवायचा आहे. विजेत्यांना तीन रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरवले जाईल. निबंध फक्त पोस्टाने किंवा कुरिअरनेच स्वीकारले जातील (प्रत्यक्ष/हँड-टू-हँड स्वीकारले जाणार नाहीत). सर्व शिक्षकांनी निबंध स्वतःच्या हस्तक्षरातच लिहिणे अनिवार्य आहे. राज्यातील मराठी व उर्दू माध्यमातील सर्व व्यवस्थापनांच्या शिक्षकांसाठी एकूण १४ आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार
आहेत. राज्यस्तरावर मराठी माध्यम (३) व उर्दू माध्यम (३), जिल्हास्तरावर (छत्रपती संभाजीनगर) मराठी माध्यम (मनपा-१, खाजगी-१, जि.प.-१) व उर्दू माध्यम (मनपा-१, खाजगी-१, जि.प.-१), विशेष पुरस्कारः क्रीडा शिक्षक (मराठी-१, उर्दू-१) आणि चित्रकला शिक्षक (मराठी-१, उर्दू-१). प्रस्ताव व निबंध पाठवण्याचा पत्ता, वीनस फूट वेअर, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, सिल्लोड निबंध व पुरस्कारासाठीचे प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत १२ सप्टेंबरपर्यत पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














