सिल्लोड, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कार्यरत आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील १५० हून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभआज मुंबईतील भेंडी बाजार येथे भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते करण्यात आला.
या राज्यव्यापी अभियानामध्ये सुमारे ५ हजार भाजपचे मुस्लिम कार्यकर्ते रक्तदान करून समाजसेवेचा संदेश देणार आहेत. राज्यभर संकलित होणाऱ्या एक लाख रक्तपिशव्यांच्या संकल्पात अल्पसंख्यांक मोर्चाचाही महत्त्वपूर्ण वाटा असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला.
उपक्रम हा राज्यव्यापी रक्तदान सामाजिक ऐक्य, सेवाभाव आणि जनकल्याणाचा संदेश अधिक दृढ करणारा ठरत आहे.












