संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या खाजगीकरणाविरोधात राज्यव्यापी बैठकीचे आयोजन

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठणची ओळख, संस्कृती आणि जनभावनांचे प्रतीक असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात आता जनआक्रोश उफाळून येत असून, या लढ्याला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी लवकरच भव्य बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठान व उद्यान बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठान करण्यात आले आहे. मी पैठणकर समितीचा पुढाकार व उद्यान बचाव
या बैठकीत राज्यभरातील सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, व्यापारी, शेतकरी, युवक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक प्रतिष्ठानचे किशोर तांगडे यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, संत ज्ञानेश्वर उद्यान हे केवळ पर्यटनस्थळ नाही, 

तर पैठणच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा आत्मा आहे. यापूर्वी झालेल्या खाजगीकरणामुळे उद्यानाची अक्षरशः दुर्दशा झाली. हे वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तरीही काही राजकीय र्ग स्वार्थासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांकडून पुन्हा खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. वे पैठणच्या जनतेच्या भावना पायदळी तुडवून उद्यान कोणाच्याही घशात घालण्याचा प्रयत्न आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. 

उद्यान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेऊन जनभावनांचा आदर करावा, अन्यथा राज्यभरातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार उद्यान बचाव समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. 

राज्यव्यापी बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा, जनजागृती मोहीम, कायदेशीर लढा आणि लोकसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. बैठकीची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असून, मराठवाड्यातील खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठान व उद्यान बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.