खूशखबर: सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय बंदीला स्थगिती

Foto

औरंगाबाद- शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली होती. मात्र खासदार चंद्रकांच खैरे आणि महापालिकेने या निर्णयाविरोधात अपील केले होते. त्यामुळे केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

 

सोयी सुविधांचा अभाव आणि महापालिकेला वारंवार नोटीस बजावूनही अंमलबजावणी होत नसल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबरला प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी खासदार चंद्रकांत खैरै, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, आणि महापालिकेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाचे सचिव मिश्रा यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. त्यामुळे मिश्रा यांनी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.