कन्नड, (प्रतिनिधी) : प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा ८ लाख ४० हजार रुपयांचा साठा कन्नड शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. ही कारवाई एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जानेवारीच्या रात्री उशीरा करण्यात आली.
कन्नड शहरातील गार का बंगला परिसरातील घरात चढ्या दराने विक्री करण्यासाठी प्रतिबंधित तंबाखूजन्य करून ठेवला असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. यावरून एएसपी अग्निहोत्री यांनी स्वतः त्यांच्या कार्यालयातील पोलीस रतन कैलास निंभोरकर, निळकंठ देवरे, पो. ना. अमोल गायकवाड, पो. ना. आशा पाटील, पो. शि. शीतल बारगळ, पो.कॉ. बाबासाहेब वाघ, मयुर वाळुंजकर, प्रतिभा निंभोरकर यांच्यासह कन्नड शहर ठाण्याचे योना सहगराव सानप, सपोनि कुणाल सुर्यवंशी, सहायक फौजदार गणेश जैन, पो. कॉ. सतीश नरवडे आदींनी ८ जानेवारीच्या रात्री उशिरा शेख जमील मुस्ताक घरात पंचांसह छापा टाकला. यावेळी शेख जमील शेख मुस्ताक (३४) आणि शेख खलील शेख मुस्ताक (३५) हे तंबाखुजन्य पदार्थ विक्री करताना दिसून आले.
७७५ रुपयांची इस्माईल स्पेशल त्यांच्या घरातून ७३ हजार बिडी, ५१ हजार ६७५ रुपयांची रुपयांची इस्माईल फरमाईश इस्माईल बिडी, १२ हजा ६७५. एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांची कन्नड शहरात कारवाई बिडी, ९२ हजा ५०० रुपयांचे सिगारेट, १२ हजार ४०० रुपयांची ५० पॉकेट रत्ना प्रीमियम तंबाखू २२ हजार २२० रुपयांचे ४८ पर्किट गोल्ड फ्लॅक मिट स्विच (बटण) सिगारेट, ७हजार २० रुपयांची रॉयल पान तंबाखू, ६८ हिरा पान मसाला आणि गुटखा विक्रीतून प्राप्त २ लाख ९९ हजार १० रुपये असा एकूण ८ लाख ३९ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाकिटे, सॅम्पल प्रयोगशाळेत जप्त प्रत्येक तंबाखूजन्य आणि सॅम्पल छत्रपती संभाजीनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी महंमद फरीद सिद्दिकी याच्याकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.















