चोरीचे मोबाईल विकणारा तरुण जेरबंद
वाळूज: औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातून चोरी केलेले मोबाईल विकणारा किरण अशोक जाधव (19) रा. शाहू नगर कॅनॉल रोड बीड, या चोरट्यास वाळूज पोलिसांनी सापळा रचून रांजणगाव शेणपुंजी येथून अटक केली असून त्याच्याकडून 1 लाख 18 हजार 500 रुपये किमतीचे 9 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाला ही कारवाई यशस्वी करण्यात यश मिळाले आहे.