सिल्लोडला गोरक्षकांवर दगडफेक, शहर ठाण्यात गुन्हा

Foto
जनावरे पकडल्याचे प्रकरण 
सिल्लोड, : जनावरे पकडण्यासाठी गेलेले पोलिस व गोरक्षक यांच्या वाहनांवर अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. यात गोरक्षकांच्या कारच्या समोरील काच फुटली. यानंतर दुचाकीवरून पळून जाणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र आरोपी दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मंगळवारी (दि. ३) ईदगाह परिसरातील एका मकाच्या शेतात कत्तलीसाठी आणलेली जनावरे बांधून ठेवलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. गुन्हे शाखा, शहर, ग्रामीण व अजिंठा पोलिस व गोरक्षक ईदगाह परिसरात गेले, यावेळी सहा जण बसलेले होते. पोलिस दिसताच आरोपींना कारवाईची भणक लागली. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यातगोरक्षकांच्या कारची (एमएच २०, ईजे- १४७९) समोरील काच फुटली.

 यानंतर आरोपींनी दुचाकीवरून धूम ठोकली. मात्र पोलिसांनी पाठलाग करताच आरोपींनी दुचाकी सोडून पळ काढला. दुचाकी असा जवळपास १४ लाख ४१ पोलिसांनी ३३ जनावरे, ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस जनावरे ठंडणगावच्या गोशाळेत पाठविली.

पोलिसांनी पकडलेल्या ३३ जनावरे ठंडणगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आली. दरम्यान अशा कारवायविळी पोलिस, गोरक्षकांवर हल्ला करण्याची ही पहिली घटना नाही. या कारवाईदरम्यान ही पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांवर दगडफेक करण्याचे धाडस अशा आरोपींमध्ये येते कोठून ? असा प्रश्थ यानिमित्ताने उपस्थित होतो.

निरीक्षक शेषराव उदार यांनी फिर्याद दिली. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायदे करीत आहेत. दरम्यान रात्री-अपरात्री पोलिसांना चकमा देऊन कत्तलीसाठी जाते. पोलिसांवर पाळत ठेवून ही जनावरांची वाहनात कोवून वाहतूक केली यावेजी करण्यात आल्या.