सिल्लोड तहसील कार्यालयाचे विभाजन थांबवा

Foto
शिवसेना (उबाठा) कडून मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले मागणीचे निवेदन

सिल्लोड, (प्रतिनिधी) राज्य सरकारने नुकतेच राज्यामध्ये काही जिल्हाधिकारी कार्यालयाचे व तहसील कार्यालयाचे विभाजन करून काही जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय काही तालुक्यांमध्ये अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिलेली असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील व अनेक तालुक्यातील नागरिकांनी आमची गावे तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी मागणी शासनाकडे जोर धरत असून शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारचे निवेदन त्यांनी दिले आहे. 

सिल्लोड तहसील कार्यालयाचे ही नुकतेच विभाजन झालेले असून अजिंठा येथे नव्याने अप्पर तहसील कार्यालयाला मंजूर मिळालेली आहे या अप्पर तहसील कार्यालयामध्ये एकूण नऊ मंडळापैकी चार मंडळे हे अप्पर तहसील कार्यालय अजिंठा येथे जोडण्यात आलेली आहे त्यामध्ये अजिंठा, शिवना गोळेगाव, अभंई, ही मंडळी समाविष्ट करण्यात
आलेली आहे.

 या मंडळांपैकी गोळेगाव मंडळातील जवळपास अनेक गावातील नागरिकांनी सदर गावे या मंडळात समाविष्ट न करता सिल्लोड मध्येच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसिलदार व ग्रामपंचायतीचे ठराव सुद्धा घेण्यात आले आहे त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

सिल्लोड शहर हे तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय व व्यापारी केंद्र आहे, महसूल विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये सिल्लोड येथे असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी सिल्लोड शहरात येत असतात. तहसील कार्यालयही सिल्लोडमध्येच असल्याने अनेक शासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची नागरिकांना सुविधा मिळत असून त्यामुळे सदर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून सिल्लोडच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, शहर प्रमुख मच्छिंद्र धाडगे, युवा शहर अधिकारी रामेश्वर इंडोले, उप तालुकाप्रमुख रामेश्वर जंजाळ, सचिन साळवे, गजानन शिंदे, सचिन भेदवे भाऊराव पिसाळ, रामदास पंडित, सुरेश शिंदे, दिलीप वर्षे, सय्यद हारुण आदी उपस्थित होते.