जोरदार वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे, सोलर पॅनलचे नुकसान

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारांचा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि जोरदार वादळी वारा, विजांचा कडकडाट तसेच गारांच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागांना झोडपून काढले. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकाची तारांबळ उडाली.

यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. दिवसभर उकाड्याचे वातावरण असताना सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले. काही वेळातच वाऱ्याचा वेग वाढला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला
सुरुवात झाली. अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, काही ठिकाणी पत्रे उडाले, तर काही ठिकाणी शेतात बसवलेल्या सोलर पॅनलेचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठाही
खंडित झाला. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असून अनेकानी शेतातील मशागतीची कामे सुरू केली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.