मूळ ओळखपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना काढले केंद्राबाहेर; वनसंरक्षक भरती परीक्षेतील प्रकार

Foto

औरंगाबाद: वनसंरक्षक भरती परीक्षेत आज सकाळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. परंतु आधारकार्डची मूळ प्रत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर काढण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागेल. 

वनसंरक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कुठल्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत परीक्षेला आणावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु काही विद्यार्थ्यांनी मूळ प्रत न आणल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आले. हा प्रकार ड्रीमलँड इंग्लीश स्कूल या परीक्षा केंद्रावर घडला. सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत पहिल्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना वनसंरक्षण भरती परीक्षेला हजेरी लावली. परंतु मूळ कागदपत्रे नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर काढण्यात आले. 

अनेकांनी मूळ ओळखपत्राची प्रत न आणल्याने त्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यासाठी विनंतीही केली. तसेच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी नितीन वावळे, लोकेश कांबळे यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. संयोजकांना विनंती केली.परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. मूळ ओळखपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही.