सिल्लोड, (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे औचित्य विद्यार्थ्यांसाठी दांडिया आणि गरबा उत्सवाचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या रंगतदार कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देणे, हा या उत्सवामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे व मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांच्या हस्ते माता दुर्गेच्या आरतीने आणि प्रतिमा पूजनाने झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी ढोलीतारो, नगाडा संग ढोल अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध गरबा गीतांवर दांडियाचा आनंद लुटला. प्राथमिक विभागातील लहान मुलांचा उत्साह आणि त्यांच्या अंगावरील रंगीबेरंगी गुजराती व महाराष्ट्रीयन पारंपरिक पेहराव यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंदमयी बनले होते.
शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे यांनी विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाचे महत्त्व आणि दांडिया-गरबा या सांस्कृतिक परंपरेची माहिती दिली. या उत्सवात उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सर्वोत्तम पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या वैभवी सुरडकर, रामेश्वरी वानखेडे, राजनंदिनी नाकीरे, पुनम नाकिरे, वेदिका नाकिरे, श्रद्धा डमाळे, रिद्धी गायकवाड, सिद्धी गायकवाड, अक्षरा कुदळ, अक्षदा गावंडे, गौरी वाघ, जानवी गायकवाड, प्रतीक्षा सातफळे, पायल डवरे, प्रतीक्षा मुरकुटे, क्रितिक्षा सोनवणे, नेहांश साळवे, आदेश साळवे, रितेश शिंदे, समर्थ पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
शेवटी सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गाढवे, भाऊसाहेब गावंडे, गणेश सुरडकर, रामेश्वर वाघ, अमोल पालोदकर, पंकज सावंत, अमोल दांडगे, मीरा पांगळे, शितल गीते आणि सुवर्णा तारो यांनी विशेष परिश्रम घेतले