नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदार जनजागृती

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी कन्नड नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे याच्या संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात आली.

एकनाथ बंगाळे व पती जीनगर मुख्याधिकारी रवींद्र लाडे यानी उपस्थित मतदारांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी स्वीप पथकाचे योगेश पाटील, प्रवीण दाभाडे, प्रतिभा कदम, भाऊसाहेब सोननीस, दिपक सोनवणे, कन्नड़ आगाराचे संघर्ष पगारे, सागर पाटील, बापूसाहेब मोरे श्रीराम पवार यांची उपस्थिती होती. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काशिनाथ पाटील जाधव प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस वदन करणारे आदिवासी गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

यात श्रेया थेटे, अनुष्का शेगडे, प्रतीक्षा जाधव, सायली मालकर, गीतांजली मगर, वेदिका वाघ, राधिका गायकवाड, अनुजा मगर, सौंदर्या थेटे, राणी पवार, मानवी राठोड, मोनाली राठोड, विद्या राठोड, प्रांजल राठोड या विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला होता. सुनीता दाबके व प्रवीण दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.