चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचा वार्षिक शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात
पारवतन कर- सफलता पाए !
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या वाटचालीत अडथळे निर्माण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत, त्यांच्या धाडसाला नवी दिशा देणारा हौसलों की उड़ान हा चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचा वार्षिक शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवारी (दि.६) तापडिया नाट्यमंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ११५ हून अधिक गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी
शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास मंत्री अतुल सावे, अखिल भारतीय मारवाडी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या म्हणून निवेदिका अनघा मोडक उपस्थित होत्या. यावेळी चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे सीए विवेक रांदड, रमेश सोनी, सीए जी.जी. रांदड, सीए अनिल बिर्ला, एल. जी. गायकवाड, उत्तम कलवणे, गणेश लोखंडे, मिकमचंद मल, सीए महेश
भागडिया, प्रकाश दांगी, प्रकल्प प्रमुख नितीन तोष्णीवाल यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेने आतापर्यंत १ हजार १७५ हून अधिक उपक्रमांच्या माध्यमातून ३,०५,८०० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचून समाजातील विविध घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले आहे, अशी माहिती अध्यक्ष सीए विवेक रांदड
चलना
की उड़ान
यांनी दिली.
या विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासावर आधारित टॉक शो आयोजित करण्यात आला होता. संघर्ष, अडचणी, मिळालेली संधी आणि त्या संधीचे यशात झालेले रूपांतर यांची कहाणी ऐकताना सभागृहातील अनेक जण भावुक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री रांदड आणि आकाश फुलझलके यांनी केले. तर चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे सचिव मुरली गुंगे पाटील यांनी उपस्थितांचे मानले.
शिष्यवृत्तीमुळे सीए, डॉक्टर झाले....
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण थांबू नये, त्याच्या क्षमतेला आणि स्वप्नांना आर्थिक अडचणींची मर्यादा येऊ नये, या उद्देशाने चेतना जीवन निर्माण आणि चेतना विद्या सहाय्यता या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाते. आजपर्यंत ३७० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करण्यात आली असून, त्यापैकी अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. चेतनेची शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण केलेले सीए प्रमोद काळणे चार्टर्ड अकाउंटंट झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून चेतनेकडून शिष्यवृत्ती मिळवत असलेले डॉ. आर्यन पारेख यांनीही वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. याशिवाय राजेश्री राउतराय एमबीबीएस तृतीय वर्ष आणि राशी लाहोटी, बीई तृतीय वर्ष यांनीही शैक्षणिक प्रवासातील संघर्ष, चेतनेकडून मिळालेली साथ आणि भविष्यातील ध्येयांविषयी मनोगत व्यक्त केले.·














