ज्ञानविकास विद्यालयात शहाजी राजे जयंती निमित्त किल्ल्यांच्या स्वच्छतेचा संकल्प
सिल्लोड, (प्रतिनिधी): शहाजीराजे भोसले यांच्या जयंती उत्सव निमित्ताने अशोकदादा गरुड शैक्षणिक समूहाचे ज्ञानविकास विद्यालय भराडीच्या विद्यार्थ्यांनी किल्ले मुरूड जंजिराची प्रतिकृती उभारली.
आपल्या भारतीयांची अस्मिता असून किल्याचे संवर्धन करणे, स्वच्छता राखणे, पावित्र्यता जपणे, किल्ल्यावर श्रमदान करणे, वृक्ष लागवड संवर्धन करत गड किल्ल्याची शोभा कशी टिकेल, वाढत राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला.
यावेळी वंदना पालकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर या मोहिमेत जीवन आमटे, रुद्र आग्रे, ब्रम्हा खडके, समर्थ मानकर, शुभम आग्रे, रेहान मदार, अमान शेख, रिजवान पठाण, आमेर शेख, मासूम शेख, रुपेश महाजन, हर्षदा गवळी, श्रावणी बिडवे, अनुजा चिंचपुरे, वेदिका गायके, तन्वी बनकर, श्रद्धा खाकरे, श्रावणी शेळके, योगिता पवार, तेजश्विनी तिडोळे, रुचिता नेव्हारे, वैष्णवी लांडगे, कल्याणी नेव्हारे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत संकल्पनेची शपथ घेतली.












