उच्च तंत्र शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांनी ताफा अडविण्याचा केला प्रयत्न विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करणारा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी आज सकाळी विद्यापीठ गेट समोर एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ताफा येताच विद्यार्थी संघटना ताफा अडविन्याचा प्रयत्न करणारच तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 


एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काळे झेंडे दाखवून विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ताफा येताच विद्यार्थी संघटना ताफा अडविण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वीच घोषणाबाजी करत असलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एमआयएम विद्यार्थी आघाडीचे डॉ. कुणाल खरात तसेच सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, रोहित धनराज, अतुल कांबळे, आवेज शेख या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या वतीने काळ्या रंगाचे निवेदन, काळ्या रंगाचे झेंडे दाखवीत निषेध करण्यात आला. यावेळी संघटनाच्या वतीने पदवी परिक्षा व निकालाबाबतचा संभ्रम दूर करण्यात यावे, नामांतर शहिदांचे स्मारक तात्काळ उभारण्यात यावे तसेच सर्व प्रकारचे शैक्षणिक व परिक्षाशल्क ५०% करण्यात यावे, याशिवाय मराठवाड्यात विकासाचे राजकारण

करण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी शहीद झालेल्या व या

लढ्यातील सर्व भीम सेनिकांच्या जखमेवर नामविस्तार करुन मीठ चोळण्यात आले. शिवाय मागील काही वर्षापासून राजकीय दृष्ट्या लाभ उठवण्याच्या हेतूने उस्मानाबाद उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणून निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. मराठवाड्यात जातीय दंगली व्हाव्यात, आंबेडकरी तरुणांचे आयुष्य

उध्वस्त व्हावे, भावनिक प्रश्नांभोवती त्यांना गुंतवून ठेवता यावे अशी मनुवादी विचारसरणी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सदरचे प्रस्तावित विभाजन तात्काळ रद्द करावे, विभाजनासाठी नेमलेली

अभ्यास समिती तात्काळ बरखास्त करावी, विद्यापीठ विभाजनाचे अधिकार व मंडळावरील सदस्यांची तात्काळ हकालपट्टी करावी या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत विद्यापीठ गेटसमोर आंदोलन करण्यात आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker