फुलंब्री, (प्रतिनिधी) फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जिप केंद्रीय शाळेतील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी बीटीएस परीक्षेमध्ये यश संपादन करीत सर्व तालुक्यात शाळेचे नाव उज्वल केले आहे.
बीटीएस परीक्षेत परिणीती भाऊसाहेब पवार हिने तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवीले तर चेतन राजू घुमरे द्वितीय, स्वरा राजेंद्र चव्हाण तालुक्यातून तृतीय, समृद्धी सतीश गोसावी हिचा पाचवा क्रमांक तर साई प्रभाकर बनसोड याने तालुक्यातून सहावा क्रमांक मिळविला आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा उंचावला आहे.












