अबॅकस स्पर्धा २०२६ साठी विद्यार्थी उत्साहात रवाना

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी)  : गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या गीताबन अबॅकस प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत अबॅकस प्रशिक्षण आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने मोफत दिले जात आहे.

या उपक्रमातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आज मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धा २०२६, छत्रपती संभाजीनगर येथे सहभागी होण्यासाठी खुलताबाद येथून उत्साहपूर्ण वातावरणात शुभेच्छांसह रवाना केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, नगरपरिषद नगरसेवक उमेश आवारे, नगरसेवक मोहन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालक गणेश मालोदे, प्रमोद आवटे, देविदास मालोदे, रंगनाथ काळे, सोमीनाथ मालोदे, ज्ञानेश्वर बोराडे तसेच शिक्षक शिवाजी पवार, गायके, गोसावी, होळकर, बोराडे, आधाने आणि इतर पदाधिकारी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनी अबॅकस उपक्रम सुरु केल्याबदल आमदार प्रशांत बंब यांचे आभार व्यक्त केले.