विद्यार्थ्यांनी माणूस बनण्यासाठी शिक्षण घ्यावे : डॉ. रश्मी बोरीकर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट पूर्ण जीवन जगले पाहिजे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी, संयम, आणि दृढनिश्चय या गुणांच्या जोरावर यश संपन्न करावे तसेच शिक्षण हे नोकरी व्यवसायासाठीच घ्यावे असे नसून अगोदर विद्यार्थ्यांनी माणूस बनण्यासाठी शिक्षण घ्यावे. आणि आईवडील व समाज यांची सेवा करावी असा सल्ला डॉ. रश्मी बोरीकर यांनी येथे दिला.

येथील श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भराडी येथे इयत्ता
बारावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, प्रमुख पाहुणे डॉ. रश्मी बोरीकर, शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल व शालेय समिती सदस्य सुभाष साकला पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरसे, प्रा. तानाजी मादळे यांची उपस्थिती होती. 

कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता येणाऱ्या त्या परिस्थिीतीचा सामना केला पाहिजे, आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोड मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे प्रास्ताविक प्रा. तानाजी मादळे यांनी अर्नेस्ट होमिंगे यांच्या ओल्ड मॅन ऑफ द सी या पुस्तकाचा दाखला देल मार्गदर्शन केले.

दरम्यान यावेळी संविधान जागर अभियान स्पर्धा परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम आले होते. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तर पाहुण्याचा परिचय प्रा. स्वाती नाकील यांनी करुन दिला. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरावी आणि समाजात गुणवान विद्यार्थी म्हणून आपली ओळख निर्माण करावी असे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य राजेंद्र कोठावदे यानी विद्यार्थ्यांना आवाहन केले.