पैठण, (प्रतिनिधी): पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) विभागातील विद्यार्थी भारतीय लष्कर सेवेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात व सीआयएसएफमध्ये भरती झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अग्निवीर मध्ये सात, महाराष्ट्र पोलीस दलात आठ, सीआयएसएफमध्ये दोन असे १७ विद्यार्थी देश सेवेत रुजू झाली आहेत. या मध्ये अग्नीवीर या भरतीमध्ये प्रसाद भोसले पैठण, नितेश मगर ईसारवाडी, सचिन पाचे हिरडपुरी, सुरज दिलवाले, जैन स्पिनर, गणेश मरकड ईसारवाडी, ओमकार महादेव आनंद महाकाळा, प्रमोद मापारी तेलवाडी, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विठ्ठल महादेव वाघ तेलवाडी, प्रशांत देविदास पाचोडे दीयानातपुर, क्षितिज हजारे दादेगाव, अक्षय पठाडे पैठण, श्याम घोंगडे तुपेवाडी, नंदू राउत बालानगर, पौर्णिमा मोहोळ पैठण, पूजा बोबडे वाहेगाव, आणि सीआयएसएफमध्ये अनुश गायकवाड पैठण, श्याम पाचे दादेगाव जहागीर हे विद्यार्थी देश
सेवेसाठी तत्पर होऊन रुजू झाले आहेत.
आणि बरेच विद्यार्थी अंतिम फेरी पर्यंत पोहोचले होते. परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांची निवड होऊ शकली नाही. पण ते पुढील वर्षात नक्की यश संपादन करतील या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे व सचिव राजेंद्र पाटील शिसोदे, सुशील पाटील सिसोदे, प्राचार्य शिवानंद सोनकांबळे, उपप्राचार्य वैजनाथ चाटे यांनी कौतुक करून भविष्यात अशा विद्यार्थ्यांना लागेल ते सहकार्य करण्याच्या आश्वासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच ५० महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बीपीएस ठाकूर व लेफ्टनंट कर्नल कीर्ती मुंडे यांनी देखील या मुलांचे अभिनंदन केले आहे.
एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट अर्जुन मोरे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच देश सेवेसाठी अशी अनेक विद्यार्थी दरवर्षी प्रतिष्ठान महाविद्यालयातील व या पंचक्रोशीतीलअसेच विद्यार्थी घडवू असा महाविद्यालयाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.














