सिल्लोड, (प्रतिनिधी) : देशात आज ही अनेक आर्थिक दृष्टीने मागास घटक स्वयंपाक व इतर कामासाठी इंधन म्हणून झाडांचे लाकडे वापरतात. मात्र मिळेल ते झाडे कापल्याने अनेक महत्वाची झाडे नष्ट होत असतात.
या अविकसित समाज घटकांना जळावू लाकूड (बायोमास) उपलब्ध व्हावा म्हणून सिल्लोड येथील वृक्ष १५०० झाडांचे २ वर्षांपासून रोपण संवर्धक व अभिनव प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांनी हट्टी, बहुली, पांगरी शिवार, हळदा ई ५ गावांच्या गलगतचे गायरान, पडीत जमिनी, ओढे, नाले या काठी विशेषतः शुष्क जमिनीवर बाभूळ, हिवर, धामोडी, महारुख, महोगणी आदि वृक्षाची २००० हुन अधिक रोपं २०२३ ते २०२५ या काळात लावली होती.
त्यापैकी सुमारे दिड हजार रोपं जगून, व्यवस्थित वाढीस लागली आहे. यातुन भविष्यात अंदाजे २०० टन जळाऊ लाकूड उपलब्ध होईल. याकामी डॉ. पाटील यांना भाऊ साहेब निकोद, भिकन सोनोने, रवींद्र तुपे, संतोष कोळी, राहुल भोटकर, आकाश मोरे- कोळी यांनी सहयोग केला आहे.















