औरंगाबाद, दि. (सांजवार्ता ब्युरो) : निराला बाजार परिसरातील एचडीएफसी बँकेच्या शेजारी कचऱ्याला आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली नाही.
निराला बाजार परिसरात मोठे कॉर्पोरेट कार्यालय आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात बँकांचे देखील कार्यालय आहेत. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास एचडीएफसी बँकेच्या शेजारी असलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. नागरिकांनी ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. तोपर्यंत कचऱ्याची आग बाजूला असलेल्या विद्युत खांबावरील केबल लागली. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत संपूर्ण आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत मोठी हानी झाली नाही. निराला बाजार परिसरात राहणारे रहिवाशी तेथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात घरातील कचरा टाकतात. महानगरपालिके कडून तो कचरा दोन दोन दिवस उचलला जात नाही. अशा प्रकारची पुन्हा घटना घडणार नाही याची खबरदारी परिसरातील नागरिकांना घ्यावी लागणार आहे. तसेच तेथील कचरा महानगरपालिकेला दररोज उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.