शहराला नव्या जलवाहिनीतून १ मेपासून पाणीपुरवठा करा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असून, योजनेच्या विविध टप्प्यांवर होत असलेल्या विलंबाबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली. मात्र महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी या सर्वांनी समन्वयाने काम करून महाराष्ट्र दिनी १ मेपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करावा, असे आदेश शुक्रवारी (दि.१०) झालेल्या सुनावणीत न्यायामूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायामूर्ती अभय मंत्री यांनी दिले. तसेच समन्वयाने काम केल्यास नक्की पाणी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासकीय अधिवक्ता अमरजितसिंग गिरासे यांनी उच्च न्यायालय गठित समितीच्या बैठकीचे
खंडपीठाचे मनपा, एमजेपी, जीव्हीपीआरला आदेश
नवीन आयुक्तांनी दिली भेट
मनपातर्फे अॅड. संभाजी टोपे यांनी सांगितले की, नवीन आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारला असून, लगेच संपूर्ण प्रकल्पास भेट दिली आहे. त्यांनी जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्र, एमबीआर, पाईपलाईन या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे. सुनावणीअंती १ मेपासून पाणीपुरवठ्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे.
इतिवृत्त सादर केले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १ एप्रिल रोजी झालेल्या या बैठकीत अमृत-२.० योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. समितीने मुद्दे मांडले की, गेल्या ३ महिन्यांत केवळ २० किमी पाईपलाईन टाकली गेली. विविध टप्प्यांवर होत असलेल्या विलंबाबद्दल समितीने चिंता व्यक्त केली आणि कंत्राटदाराला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कंत्राटदार कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ
अॅड. धोर्डे यांनी सांगितले की, जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र हे ३८ किमीचे अंतर असून, त्यापैकी ३६ किमी अंतर टेस्टिंग पूर्ण करण्यात आली आहे. ढोरकीन येथे स्कोर व्हॉल्व्ह तुटल्याने जलवाहिनीतून पाण्याची चाचणी चाचणीत एक ठिकाणी गळती आढळून आली असून, ती दुरुस्त केली. येत्या रविवारी (दि.१२) चाचणी पुन्हा सुरू होईल, असे सांगितले.