राम मंदिरातील चोरी प्रकरणी दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Foto
नवी दिल्ली : राम मंदिरात झालेल्या चोरीबाबत आज झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीवेळी या प्रकरणी दाखल असलेल्या सर्व याचिका निकाली काढल्या. राम मंदिरातीलचोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला. तसेच याबाबतची पुढील कारवाई ट्रायल कोर्टाने कायद्यानुसार करावी, असे आदेश दिले.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये भाविकांकडून देण्यात  येणार्‍या देणग्या आणि दानाच्या रकमेवर डल्ला मारता जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. याबाबत जून महिन्यात अधिकृतपणे गुन्हा दाखल होऊन तपासाला सुरुवात झाली होती. दरम्यान, या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यामूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना  यांय्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली. या प्रकरणी स्वतंत्र चौकशाी व्हावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते आता या प्रकरणी खटला प्रलंबित असलेल्या ट्रायल कोर्टात जाऊ शकतात, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.

तसेच आरोपी विरुद्ध राज्य असा हा सरळ साधा खटला नाही. यामध्ये सार्वजनिक हिताचा काही भागही समाविष्ट आहे. त्यामुळे एखाद्या गुन्ह्यातील पीडितांना कोर्टात सहकार्य  करण्याची परवानगी कायदा देतो, त्याचप्रमाणे आम्ही तुम्हालाही न्यायालयात सहकार्य करण्याची परवानगी देत आहोत, असे सुप्रीम  कोर्टाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणी आता ट्रायल  कोर्टाने कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.