जगतगुरु जनार्धनस्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी "लढा राष्ट्रहिताच्या, संकल्प शुद्ध राजकारणाचा!" हि भूमिका स्वीकारून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना वेरूळ येथील आश्रमात पत्रकार घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढ्यावरच न थांबत निवडणूक प्रचार काळात स्वतः च्या ५० वाहनातून भक्तगण प्रचार करणार असल्याचेही सांगितले.
राजकारणातीलभ्रष्टाचार, घराणेशाही, गुन्हेगारीकरण, जातपात व धर्माच्या नावाने राजकारण सुरु आहे, हे निश्चितच राष्ट्रहिताचे नाही. म्हणून विकासाची दृष्टी व निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणून जय बाबाजी भक्क्त परिवाराच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, जळगाव व धुळे या भक्तबहुल जिल्ह्यातही जय बाबाजी भक्त परिवारातर्फे विविध उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे, असे राजकीय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती देण्यात आली. यावेळी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव, राजकीय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार
रामानंद महाराज, काकासाहेब गोरे, कैलास बोराडे, झुंबर मोडके, राजाभाऊ पानव्हाणे, नीतीन, सरकटे दिलप बनकार इत्यादी उपस्थित होते.