स्वामी यांची बदली; विनय गौडा जिल्हाधिकारी

Foto
स्वामी यांची बदली; 
विनय गौडा जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. तर त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे बदलून आले आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी पद हे कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून त्या जागी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गौडा हे महाराष्ट्र केडरचे २०१५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी कर्नाटक राज्यातील सुरतकल प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्रात बी. टेक. पदवी मिळवलेली आहे. दिलीप स्वामी हे गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. 
या दोन वर्षांत त्यांनी महसुली सेवांच्या सुलभीकरणासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले. यात फेरफार अदालत, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण हेल्पलाईन, जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी, अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर आदी उपक्रमांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी त्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्री अभियान राबविले. विनय गौडा यांना त्वरित नवीन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.