कन्नड, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व व्याख्यान मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करून करण्यात आली.
यानिमित्त आयोजित व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीने हिंदुत्वङ्ग या विषयावर प्रमुख वक्ते गौरव महाराज खरे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देश, धर्म आणि हिंदुत्वासाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा आढावा घेतला. काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमानातील तुरुंगवास, समुद्रात घेतलेली ऐतिहासिक उडी तसेच हिंदू समाज संघटित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
यावेळी सुप्रिया कुलकर्णी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य व काव्यरचनांवर भाष्य करत
त्यांच्या विचारांचा गौरव केला.
दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष शशिन जाधव, अध्यक्ष विजय वाणी, उपाध्यक्ष प्रवीण आहिरे, सचिव संजय जोशी, सहसचिव अरविंद राठोड, सदस्य अभिषेक शेळके, ऋषिराज वैष्णव, ज्येष्ठ स्वयंसेवक पाडळकर गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिल्लोड जिल्हा संघचालक शेखर मांडे, कालिदास उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. अमरसिंग सातपुते, प्रशांत चिटणीस, योगेश दहिवाल, अजिनाथ बडख, आरती बामणे, वर्षा घुमरे, दुर्गा वाघ, विजय पैठणकर आणि सुभाष कदम यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन दिपक शिरसाट यांनी केले. प्रास्ताविक मयूर राठोड यांनी मांडले, तर समारोप संजय जोशी यांनी केला. आभार प्रदर्शन प्रमोद ढोले यांनी केले.















