शिक्षिकेची फसवणूक; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) कायमस्वरूपी : नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर १० वर्षे विनापगार राबवून घेत एका महिला शिक्षिकेची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हक्काचा पगार आणि दिलेले पैसे परत मागितल्यामुळे संतप्त झालेल्या संस्थाचालकाने व त्याच्या कुटुंबियांनी शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ करत शाळेतून हाकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात संस्कार प्रबोधिनी शाळेच्या संस्थाचालकासह कुटुंबातील चार जणांवर फसवणूक आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
दहा वर्षे बिनपगार
५ लाख रुपयांची मागणी केली असता, लालसरे कुटुंबीयांनी जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकीही दिली. दहा वर्षे विनापगार काम करूनही कायमस्वरूपी आदेश व पगार न मिळाल्याने २६ आणि २७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने पती आणि नातेवाइकांसह लालसरे यांचे घर व शाळा गाठली. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर करत आहेत.
करण्यात आला आहे.
संस्कार प्रबोधिनी शाळेचे संस्थाचालक जयंत लालसरे, त्याची पत्नी अलकावती जयंत लालसरे, मुलगी आरती देशमुख आणि मुलगा अंकुश लालसरे अशी आरोपींची नावे आहेत. जवाहरनगरातील उत्तमनगर येथील ३६ वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यांचे एमए डी.एड. शिक्षण झालेले असून २०१० मध्ये आरोपी
जयंत लालसरे याने त्यांना कायमस्वरूपी नोकरीचे आणि शासकीय नियमानुसार पगार देण्याचे आमिष दाखवले. ५ लाख रुपयांची मागणीही पूर्ण करण्यात आली. रुजू झाल्यानंतर कधीही पगार देण्यात आला नाही. दरम्यान हलक्या जातीची आहेस असे हिणवत छळ केला. त्यामुळेㄷ २०१६ मध्ये शिक्षिकेचा गर्भपात झाल्याचा आरोपही तक्रारीत व करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














