सिल्लोड, (प्रतिनिधी) : होळी सणाच्या निमित्ताने सिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात २ मार्च समाजातील हुंडाबळी, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या, कॉपीमुक्ती, तंबाखूजन्य पदार्थ, महिलावर अत्याचार, दहशतवाद, अहंकार, अंधश्रद्धा अशा विविध अनिष्ट रूढी परंपरांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा सपाटे व सहशिक्षक गणेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून अनिष्ट रूढी परंपरांच्या फलकांचे रावण रुपी सांगाडा तयार करून सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या साक्षीने त्यांची होळी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना या अनिष्ट रूढी व परंपरांच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक निशांत म्हस्के, निवृत्त शिक्षक रमेश सोनवणे, संगीता तायडे, संगीता काळे, मधुकर मगर, लक्ष्मण कोलोड, नरेश सिंग राजपूत, रमेश परदेशी, अमोल ताटू, गजानन दौड, अंगद काळे, भास्कर सागरे, अरविंद सोनवणे, नम्रता वडमारे, हर्षदा सानांसे, पंकज सावंत यांची उपस्थिती होती.













