आग्य्रातील ताजमहल उघडला, दख्खनचा ‘ताज’ कधी उघडणार?

Foto
 कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यातच पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात आले आहे. गेले सहा महिन्यांपासून पर्यटन स्थळे बंद आहेत. त्याचा परिणाम अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आग्राचा ताज तर उघडला आता आगर्‍याची प्रतिकृती असलेला दक्खनचा ताज कधी उघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
एकीकडे कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यातच दुसरीकडे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच पर्यटन स्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आग्रा येथील ताज उघडण्यात आले आहे. मात्र औरंगाबाद शहरातील दक्खनचा ताज कधी उघडण्यात येणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक देश, विदेशातून बीबीका मकबरा सह आदी पर्यटन स्थळांना भेटी देतात. त्यामुळे छोट्या छोट्या व्यवसायिकांना त्याचा फायदा होतो. बीबीका मकबरा या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक भेटी देतात. यामुळे व्यवसायिकांना त्याचा फायदा होतो. बीबीका मकबरा बाहेर असलेले फेरीवाले, पॉपकॉर्न विक्रेते, भेळ, फुटाणे विक्रेते असे जवळपास 200 कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. परंतु कोरोनामुळे पर्यटन स्थळे बंद असल्याने जवळपास 200 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच आर्ट गॅलरी, गाईड तसेच हॉटेल्सधारकांसह आदींवर देखील याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बीबीका मकबरा कधी उघणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे. 
 व्यवसायिकांना फटका
औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी बीबीका मकबरा बरोबर पान चक्की, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी या पर्यटन स्थळांना सर्वाधिक देश-विदेशातून पर्यटक शहरात येतात. पर्यटन स्थळांना भेटी देतात. परंतु कोरोनामुळे गेले सहा महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळे बंद असल्याने पर्यटन क्षेत्राचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांनाही याचा फटका बसला आहे. जवळपास आता सर्व पूर्वपदावर येत आहे. तर पर्यटन क्षेत्राला मात्र अजूनही ब्रेक लागलेला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पर्यटन स्थळे कधी उघडणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker