बकर्‍यांना लागला रेल्वेस्थानकाचा लळा

Foto

औरंगाबाद:  रेल्वेस्थानकात जनावरांचा सुळसुळाट असल्याने रेल्वे सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी औरंगाबाद रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर अचानक बकर्‍यांचा कळप शिरला. जणू काही त्यांना रेल्वे स्थानकाचा लळाच लागला असे चित्र पहावयास मिळाले. या बकर्‍या बराच वेळ स्थानकात फिरत होत्या. मात्र, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून आले. त्यामुळे पुन्हा रेल्वे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे गैरप्रकार होण्याचीही शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.  याआधी देखील रेल्वे पटरीवर मोकाट प्राणी आल्याचे प्रकार घडले आहेत.  इतकेच नव्हे तर बुलेटस्वारही रेल्वेस्थानकात शिरले होते. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाने ही बाब अद्याप गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. आज तर चक्‍क बकर्‍यांचा कळपच रेल्वे प्लॅटफॉर्मवर शिरला. हा कळप कुणाचा आहे? या बकर्‍यांच्या मालकाचा शोध रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांनी घेऊन कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.