वर्ग दोन जमिनींच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
अलिम चाऊस
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथील गट क्रमांक २१४ मधील भोगवटदार वर्ग २ जमिनीच्या फेरफार प्रकरणाने संपूर्ण महसूल प्रशासनाला हादरवून सोडले आहे. सांजवार्ताने सातत्याने उघडकीस आणलेल्या या गंभीर प्रकरणात अखेर वैजापूर गंगापूर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण ज-हाड यांनी संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मात्र, या प्रकरणात केवळ तलाठ्यावर कारवाई अभय देण्यात येत असल्याचा आरोप आता करून इतर जबाबदार अधिकारी व संबंधित घटकांवर नागरिकांकडून होत आहे. विशेषतः गंगापूर येथील दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का होत नाही, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. मौजे भेंडाळा गट क्रमांक २१४ मधील भोगवटदार वर्ग २ जमिनीच्या संदर्भात तहसीलदारांनी सादर केलेल्या प्रस्तावानंतर झालेल्या चौकशीत फेरफार नोंदी करताना नियमबाह्य पद्धती, आदेशांचे उल्लंघन आणि शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या गंभीर अनियमिततेमुळेच संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या जमिनीचे दस्तावेज गंगापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तयार झाले असताना त्या कार्यालयाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. महसूल नियम धाब्यावर बसवून दस्तावेज नोंदविले जात असतील, तर त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की भेंडाळा सजाचा कार्यभार तात्काळ काढून घेण्याचे आदेश तहसीलदारांकडून तलाठ्याची तातडीने कदली नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कर्मचाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात या प्रकरणात जमीन खरेदी व्यवहार लिहून घेणारा व्यक्ती हा माजी महसूल कर्मचारी असल्याची चर्चा आहे.
संबंधितांनी पूर्वीच्या महसूल कायदे व नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत असून, त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार, असा सवाल सागर प्रकाशनचे जवान गावकऱ्यांकडून केला जात आहे.
आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी
आठ कोटींचा संशयास्पद व्यवहार, आयकर चौकशीची मागणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वर्ग २ जमीन नावावर न करता केवळ दस्तावेजांच्या आधारे पुढे एका मोठ्या कंपनीला जवळपास आठ कोटी रुपयांत करारनाम्याद्वारे व्यवहार करण्यात आला. माजी शासकीय कर्मचाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, याची आयकर विभागाकडून चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. हे संपूर्ण प्रकरण गंगापूर तालुक्यातील वर्ग दोन जमिनींच्या मोठ्या रॅकेटकडे निर्देश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता...
या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असली तरी, ही केवळ सुरुवात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका, संबंधित अधिकारी, दस्तावेज तयार करणारे आणि आर्थिक व्यवहार करणारे सर्व घटकांची सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाबाबत सांजवार्ताने सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचाच परिणाम म्हणून ही कारवाई झाल्याची गंगापूरात चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मौजे भेंडाळा, गट क्रमांक २१४ मधील भोगवटदार वर्ग २ जमिनीच्या फेरफार प्रकरणात प्राथमिक चौकशीत गंभीर अनियमितता आढळून आली आहे.
शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधित तलाठ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. महसूल प्रशासनाची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर व दंडात्मक कारवाया करण्यात येतील.
- डॉ. अरुण जहऱ्हाड, उपविभागीय अधिकारी,
वैजापूर-गंगापूर
तलाठ्यावर कारवाई झाली, हे योग्य आहे. इतर अधिकाऱ्यांवरही तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत. वर्ग दोन जमिनींच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. या प्रकरणाची आयकर, आर्थिक गुन्हे शाखा व एसीबीमार्फत चौकशी झाली पाहिजे. गरिबांच्या जमिनीवर दलाल व अधिकारी डोळा ठेवून आहेत. शासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
- ग्रामस्थ, भेंडाळा














