प्रदेशाध्यक्षपदासाठी पाटील, महाजन, लोणीकर, मुंडेंची चर्चा

Foto

मुंबई: रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असून, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महिनाभरात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ गटातील सूत्रांनी दिली. 

महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सोबतच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आशिष शेलार यांचीही नावे चर्चेत असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही काही नावाची चर्चाही सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटनात्मक पातळीवर भाजपमध्ये आधी वॉर्ड समिती, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष अशी निवड प्रक्रिया आहे. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आधी प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. वरिष्ठ पातळीवर त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय अध्यक्ष निवडीपाठोपाठ नूतन प्रदेशाध्यक्षची निवड अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका असल्याने तूर्तास दानवे यांच्याकडेच जबाबदारी ठेवावी का, असाही एक मतप्रवाह असल्याचे समजते. मात्र, त्याची शक्यता कमी असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker