पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात तालुका, शहर काँग्रेस रस्त्यावर

Foto
तहसीलदार यांना दिले निवेदन

पैठण, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या डिपीसी बैठकीत शासनाने मका व कापूस खरेदी सुरू करावी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना, खासदार डॉ. कल्याण काळे यांना बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रोखल्याने पैठण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर पालकमंत्र्यांच्या वृत्तीचा निषेध करून घोषणाबाजी केली.

व तहसीलदार ज्योती पवार यांना तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष, रमेश मुळे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हसनोदिन कटयारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी काटे, जिल्हा सचिव युनुस पठाण, अल्प संख्यख, तालुका अध्यक्ष, मुक्तार पठाण, माजी उप नगराध्यक्ष अंबादास ढवळे, विधी आघाडीचे गणेश शिंदे, दत्तात्रय काळे यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे, शासनाने शेतकऱ्यांसाठी मक्का खरेदीला हमीभाव दिलेला आहे. प्रती क्विंटल २५०० रुपये प्रमाणे हमीभावाने मक्का खरेदी करावी. परंतु असे न होता व्यापारी १२५० प्रती क्विंटल खरेदी दराप्रमाणे खरेदी करत असून यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.

कापसालाही हमीभाव देण्यात यावा. कांदा, कापूस, सोयाबीनचे पडलेले भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मक्का खरेदी केंद्राचा प्रश्न यामध्ये शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी सरकारने थांबवावी. शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करावा, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, नसता काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असा इशारा निवेदनात दिला आहे, यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.