तलवाडा घाट तब्बल तास ठप्प ट्रॅफिक पोलिस नावालाच

Foto
 तलवाडा घाट तब्बल तास ठप्प ट्रॅफिक पोलिस नावालाच
वैजापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील तलवाडा
घाटात शुक्रवार सकाळपासून वाहनांची गर्दी उसळली. सकाळी दहाच्या सुमारास एक अवजड ट्रक घाटाच्या मधोमध बिघडल्याने संभाजीनगर-मालेगाव महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे कोलमडली. याचा परिणाम पाच तास तलवाडा घाटात वाहतूक वस्किळीत झाली.
या काळात घाटाच्या दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने रांगेमध्ये उभी राहिलेली आढळून आली. प्रवाशांना उन्हात पाण्यावाचून अक्षरशः थांबून रहावे लागले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शेवटी दुपारनंतर वन वे वाहतूक सुरू करण्यात आली आणि अडकलेल्या वाहनांना सुटका मिळाली. शिऊर पोलिसांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत केली, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
घाटाची दुर्दशा कायम
तलवाडा ते कसारी या सुमारे चार किलोमीटरच्या घाटातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
चढावावर मोठमोठे खड्डे, तुटलेले कठडे आणि अरुंद रस्ता यामुळे दररोज अपघाताचे थोके वाढले आहेत. वाहन चालवणे म्हणजे जणू मृत्यूशी खेळच !
नांदगाव, चाळीसगाव आणि मनमाड या भागाकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर धावत असते. मात्र, महामार्ग प्राधिकरणाकडून या घाटाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
महामार्ग प्राधिकरण झोपेत आहे का ?
घाटातील दुरवस्था आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, तरी देखील ट्रॅफिक पोलिस नावालाच अशा शब्दांत वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला.
रस्त्यावरील वाहतूकीची जबाबदारी कोणाची ?
घाटातील जीवघेणी स्थिती लक्षात घेता महामार्ग विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून घाटाचा रस्ता दुरुस्त करणे आणि ट्रॅफिक व्यवस्थापन मजबूत करणे अत्यावश्यक झाले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions