टँकर - दुचाकी अपघात; महिला जागीच ठार

Foto
गंगापूर – लासूर स्टेशन रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच

गंगापूर, (प्रतिनिधी): पाण्याचा टैंकर आणि दुचाकी अपघातात महिला जागीच ठार झाली. गंगापूर- लासूरस्टेशन रस्त्यावर शनिवारी (दि.३१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
रस्त्यावर गंगापूर- लासूरस्टेशन गेल्या काही महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरुच आहे. 

या अरुंद रस्त्याचे डांबरीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. शनिवारी दुपारी सिद्धनाथ वाडगाव जवळील पेट्रोलपंपासमोर झालेल्या अपघातात आरती भागीनाथ मोरे (रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर) या दुचाकीस्वार महिलेला या खडतर रस्त्यावर जीव गमवावा लागला. आरती ह्या आपले वडील भागीनाथ मोरे यांच्यासोबत दुचाकी (एमएच १४ एचबी ६७४०) वर चालल्या होत्या. गंगापूर - लासूरस्टेशन या अरुंद रस्त्यावर सिद्धनाथ वाडगाव जवळील पेट्रोलपंपासमोर टैंकरला (एमएच ५०- २०६३) पाण्याच्या ओव्हरटेक करत असताना धक्का बसला. यात आरती मोरे खड्डयामुळे दुचाकीला टँकरचा रोडवर कोसळल्याने टैंकरखाली चिरडल्या गेल्या. 

यात त्या जागीच ठार झाल्या. भागीनाथ मोरे हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, अनिकेत मुळक, संदीप गंडे, ओम वाघ, ऋषी चव्हाण, शाहरुख पठाण, मयूर राजपूत, सागर डमाळे, शुभम योगेश, जैस्वाल यांच्या  मदतीने तसेच शिल्लेगाव पोलिसांच्या सहकार्याने जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-- रस्ता कामास गती देण्याची मागणी --
गंगापूर - लासूरस्टेशन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यावर प्रवास करणे त्रासदायक, जीवघेणे बनले आहे. २ या अरुंद रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत त्यावरील खड्डे तरी लवकर बुजवावेत अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांतून होत आहे. या रस्त्यावरील अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक लावण्याच चालकांनी वाहने चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे.