छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील दुकाने फोडून मिळवलेली चोरीची रक्कम जुगाराच्या डावावर उधळणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात आले. चोरी करायची आणि लगेचच जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन पैसे उडवायचे, असा अजब कारभार करणाऱ्या या जोडगोळीला मंगळवारी (दि. २६) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघांच्या अटकेमुळे शहर परिसरातील सिटी चौक, सिडको आणि जिन्सी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल ७ घरफोड्यांचे आणि चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस
आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निसार अहेमद गफार पठाण ऊर्फ सलमान दुल्हन (२८, रा. संजयनगर, बायजीपुरा) आणि गणेश शामराव सदावर्ते (३४, रा. राजीव गांधीनगर, रेल्वे स्टेशन) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक
▶ काही दिवसांपासून शटर फोडीचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींची माहिती गोळा करणे सुरु केले. त्यात शटर फोड्या करणारा पडेगावातील एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असताना हे गुन्हे घडल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सलमान दुल्हनची माहिती घेतली असता सध्या त्याची चंगळ सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी निसार अहेमद ऊर्फ सलमान दुल्हन आणि त्याचा साथीदार गणेश सदावर्ते यांना अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
गजानन कल्याणकर यांनी दिली. औरंगपुरा चौकातील सात दुकाने फोडल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या होत्या. शटर फोडीचे सत्र सुरुच होते. मात्र, चोरटा पोलिसांना सापडत
नव्हता. सलमान दुल्हनबाबत माहिती मिळाली. त्याला दलालवाडी येथून अटक केली. त्याने गणेश सदावर्तेसोबत शटर फोडल्याची कबुली दिली.














