शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरण सीआयडीकडे वर्ग पीएसआयसह पाच जणांना अटक व नंतर जामीन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वेरूळच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पीएसआय एकनाथ नागरगोजे यांचा थेट सहभाग समोर आल्याने पोलीस महासंचालक कार्यालयातून तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सीआयडीची एन्ट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
२४ मे रोजी वैजापूर ठाण्यात धोंदलगाव येथील रवी आवारे
गुन्हे अन्वेषण विभाग CID
महाराष्ट्र पोलीस दोषान्वषनः सत्यगवेषनाथ
यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एक आरोपी वेरूळ येथे असल्याची माहिती मिळताच तपास अधिकारी पीएसआय नागरगोजे व अंमलदार बाळू बोरसे हे खासगी वाहनाने तेथे गेले. तेथे शिक्षक सुरेश बोरसे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात पोलिसांनी बोरसे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीतच बोरसे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यानंतर या गुन्ह्यात पीएसआयचा सहभाग निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पीएसआय नागरगोजे व अंमलदार बाळू बोरसे या दोघांनाही तात्काळ निलंबित केले.
या प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत रवींद्र रखमाजी आवारे, ओंकार बाबुराव बोरसे, बाळू विश्वनाथ इंगळे, सोमनाथ अशोक चोथे व पीएसआय एकनाथ नागरगोजे अशा पाच जणांना अटक केली. मात्र, न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions