मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवळूखकर असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी गणेश देवळूखकर याने पीडितेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले होते. ती भेटीसाठी गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून तिला पाठीमागून ओढले. त्यानंतर जबरदस्तीने मिठी मारून तिचा विनयभंग केला आणि लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून घेतले ताब्यात
या प्रकारानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश देवळूखकर याच्याविरुद्ध कलम ७५(३) तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले पूर्वेत या तरुणीचा शिक्षकाने विनयभंग केला, विलेपार्ले पूर्व विनयभंग केल्याप्रकरणी ४७ वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.आरोपी गणेश देवळूखकर याने पीडितेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले. भेटीदरम्यान आरोपीने तिचा हात पकडून पाठीमागून ओढले. त्यानंतर जबरदस्तीने मिठी मारून मुलीला चुकीचा स्पर्श करत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात कलम ७५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे, आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती समोर आली आहे.