साजवार्ता
Dage No/11/2026
उपक्रम
साडेचारशेहून अधिक शाळांमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): टाइप
१ मधुमेह असलेल्या मुलांना वेळीच उपचार मिळावेत आणि त्यांना शाळांमध्ये सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळावे, यासाठी उडान संस्थेच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जागतिक मधुमेह दिनानिमित्त लवकर ओळख, वेळेवर कृती हा संदेश देत मराठवाड्यातील ४५० हून अधिक शाळांमध्ये वन चाइल्ड वन स्कूल उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी संवाद साधून टाइप-१ मधुमेहाची लक्षणे व वेळीच उपचारांचे महत्त्व पटवून दिले असल्याचे उडानच्या संस्थापिका डॉ. अर्चना सारडा आणि डॉ. संपत सारडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उडान संस्था गेल्या २६ वर्षांपासून मराठवाड्यासह
अभियान १६० देशांमध्ये
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने १९९१ मध्ये सुरू केलेले हे अभियान आज जगातील १६० हून अधिक देशांमध्ये राबवले जाते. इन्सुलिनचे सहशोधक सर फ्रेडरिक बॅटिंग यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस निवडण्यात आला आहे. मधुमेहाविषयी जागरुकता निर्माण करणे, योग्यवेळी निदान होणे आणि प्रत्येकाला आवश्यक उपचार मिळणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे, यावर्षी २०२६-२७ साठी आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने मधुमेहाबाबत वेळीच कृती ही संकल्पना जाहीर केली आहे. उडान संस्था दरवर्षी या जागतिक संकल्पनेशी जोडून स्थानिक पातळीवर जनजागृतीचे उपक्रम राबवते, असेही डॉ. अर्चना सारडा यांनी स्पष्ट केले.
१८ जिल्ह्यांतील ग्रामीण व वंचित घटकांमधील मुलांना इन्सुलिन, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि नियमित मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमात
उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना उडान इम्पॅक्ट अवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार असून, मधुमेहग्रस्त मुलांच्या उपचारासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचाही
सन्मान होणार आहे. दरम्यान, रविवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत एसएफएस मैदानावर उडान उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थ, मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि कलाप्रदर्शन असे विविध उपक्रम होणार आहेत. १८ जिल्ह्यांतील मधुमेहग्रस्त मुले व त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार असून, सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत विशेष रंगमंचीय सादरीकरण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांच्यासह घाटीच्या अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, सीएमआयए अध्यक्ष ए. नंदावत, सचिव अजिंक्य सावे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Powered By: Vrudhee Solutions












