छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): टीईटीची सक्ती करू नये या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. आज राज्यभरातल्या शाळांनी बंद पुकारला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण तीन हजारांहून अधिक शाळांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
टीईटीची सक्ती केल्याने शिक्षकांच्या नोकरी धोक्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सरसकट सर्वच शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सर्वच शिक्षक हैराण झाले आहेत. त्यातल्या त्यात वर्ष वर्ष अनेक विद्यार्थ्यांना गडविणार्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षेची सक्ती केली असल्याने शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आणि टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच नोकरी असा अन्यायकारक निर्णय घेतला तर शाळा चालतील कशा? असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला. त्यामुळे टीईटीची सक्ती करू नये. या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी शाळा बंद आंदोलन केले. आज शहरातीलच नव्हे जिल्ह्यातील तीन हजार शाळा बंद ठेवल्या आहे. तसेच शहरातीलक्रांती चौक येथुन विविध शिक्षक संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना दुपारनंतर निवेदन देऊन मागण्या मांडल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील २२ हजारांहून अधिक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग
टीईटी विरोधात शाळा बंद आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातील शाळांनी यात सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यातील शाळांनी देखील शंभर टक्के बंदमध्ये सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील जवळपास २२ हजारांहून अधिक शिक्षकांनी शाळा बंद मध्ये सहभाग नोंदविला. तर राज्यातील ५५ हजारांहून अधिक शाळांतील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग नोंदवला.
पगार काटला तरी चालेल परंतु आंदोलन करूच
टीईटी विरोधात आज सर्व शिक्षक एकवटले असून शंभर टक्के शाळा बंद ठेवण्यात आल्या. राज्यभरात होणार्या शाळा बंद आंदोलनात जर सहभाग नोंदवला तर एक दिवसाचा पगार काटू असा इशारा शासनाने दिला असला तरीही पगार काटला तर काटला आंदोलनात सहभागी होऊच अशीही भूमिका आज शिक्षकांनी घेतली.
या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे
राज्यातील सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे सेवेत रुजू असलेल्या शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेण्यात येऊ नये. या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्वच शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेऊ नये. याशिवाय १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे १५ मार्च २०२४ चा निर्णय रद्द करण्यात यावा. याशिवाय सेवेत असलेल्या शिक्षकांना पेन्शन मिळावी. या मागणीसाठी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात आले.