भराडी येथे तापमान ४१ अंश सेल्सियसच्या पुढे

Foto
नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी

सिल्लोड, (प्रतिनिधी): दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून भराडी येथे तापमान ४१ अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा सुती कपडे बांधल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी योग्य आहार व संरक्षणाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत  दिवसातून पुरेसे व स्वच्छ पाणी पिणे आवश्यक ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचा वापर वाढवावा पालेभाज्या, फळे, कलिंगड, खरबूज, काकडी यांचा आहारात समावेश करावा, मसालेदार, तेलकट व अतिगरम पदार्थ टाळावेत.

उन्हापासून सुरक्षा देणारा चष्मा वापरावा दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. बाहेर पडताना सुती व सैल कपडे वापरावेत डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा पायात चामड्याचे किंवा कापडी बूट चप्पल वापरणे योग्य डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी उन्हापासून सुरक्षा देणारा चष्मा वापरावा. उन्हाळ्यात योग्य आहार, पुरेसे पाणी व साधे संरक्षण यामुळे उष्माघात व इतर त्रास टाळता येऊ शकतात.
- डॉ. तात्याराव लहाने, नेत्रचिकित्सक, सेवानिवृत्त अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय