छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): शहरातील तापमानात कमालीची घट होताना दिसत आहे. त्यात काल शहरातील तापमानात अचानक मोठी घट नोंदवली गेली आहे. शहरात तापमान सुमारे ११. ६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहेत. लोकांमध्ये थंडीने तापलेली पायरी जाणवू लागली आहे. हे नियमीत थंडीपेक्षा लक्षणीय जास्त आहे. दिवसेंदिवस तापमानात होत असलेली घट यामुळे शहर गारठले आहे.
शहरातील सकाळ-संध्याकाळच्या हवेमध्ये थंडी आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ झाली आहे. आधीच्या तुलनेत गरम कपड्यांचा वापर वाढला आहे. इतकेच नव्हे तर यंदा शहरात थंडीचा अंदाज वाढल्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे, घरे गरम ठेवणे, आणि रात्री सकाळ काळजी घेणे सुरू केले आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय घट झाली असून पहाटे आणि रात्री कडक थंडीचा जोर वाढला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. शहरातील किमान तापमानात मोठी घसरण नोंदली गेली असून रस्त्यांवर सकाळच्या वेळेस दाट धुकेही पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा कहर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर करावा, लहान मुले व ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
असले घटले तापमान
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी पहाटे किमान तापमान तब्बल ११. ६ अंश सेल्सिअसवर घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा तीव्र अनुभव आला. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात इतकी घसरण झाल्याने शहर चांगलेच गारठले आहेत. त्यात गेले काही दिवसांपासून तापमान पाहिले तर २५ नोव्हेंबरला तापमान १६. ९ सेल्सिअसवर होते. तर त्यात हळुहळु घट झाली. शनिवारी (दि.२९) तापमान १३.६ अंशावर गेले. आणि हळूहळू तापमानात घट होऊन दोनच दिवसात दोन अंशाने तापमानात घट झाली. रविवारनंतर तापमानात कमालीची घट होऊन सोमवारी तापमान ११.६ अंशावर जाऊन पोहचले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीच्या प्रमाणात मागील काही दिवसांच्या तुलनेत वाढ जाणवू शकते. येथे कमाल तापमान सुमारे २८.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे १०.० अंश सेल्सिअसवर स्थिरावेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. जालना जिल्ह्यात मात्र दिवसभर अंशतः ढगाळ परिस्थिती राहण्याचे अनुमान आहे. कमाल तापमानात जवळपास दोन अंशांची घसरण होऊ शकते, त्यामुळे थंडी अधिक तीव्र भासणार आहे. परभणी जिल्ह्यातही आकाश स्वच्छ राहून पहाटेच्या वेळेला गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.















